Solapur News | एका क्लिकवर कळणार 'शैक्षणिक रेकॉर्ड'

'अपार आयडी' : नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश
solapur news
Pudhari
Published on
Updated on
अमोल साळुंके

सोलापूर : राज्यातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी शासनाने आता नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना बाराअंकी 'अपार आयडी' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक रेकॉर्ड नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे 'यू-डायस' प्रणालीमधून 'अपार आयडी' तयार करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्र शासनाने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे 'अपार आयडी' काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रारंभी नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे 'अपार आयडी' कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला बाराअंकी 'अपार आयडी 'अपार आयडी' तयार करणे आणि वापर करण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना 'अपार आयडी'बाबत संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच यासाठी शासनाने पोर्टल विकसित केले आहे. तो 'अपार आयडी' शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे 'अपार आयडी'चा नंबर विद्यार्थ्यांना व्यवस्थित ठेवावा लागणार आहे.

काय होणार फायदा

'अपार आयडी 'मुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यास मदत करणे आदी बाबींना डिजिटल नियंत्रित करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड ऑनलाईन तपासता येणार आहे.

रेकॉर्ड ऑनलाईन पाठविणे होणार सुलभ

'अपार आयडी' प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news