Aditya Thackeray : दुष्काळ जाहीर, अंमलबजावणी कशी करणार!

आदित्य ठाकरे यांची पीक नुकसानीची पाहणी : बोरामणीत शेतकऱ्यांच्या बांधावर
Aditya Thackeray : दुष्काळ जाहीर, अंमलबजावणी कशी करणार!
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे शनिवारी (दि. २६) दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सरकारने दुष्काळाबाबत निर्णय घेतला. आता दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करणार, शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे शेतकरी एजाज पठाण यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची ठाकरे यांनी पाहणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पीक वाळून गेल्याचे शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले.

ठाकरे म्हणाले की, ‘दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर शहरी भाग आणि एमआयडीसीवरही होणार आहे. शासन निर्णयात नेमक्या कोणत्या उपाययोजना आहेत. शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे कशी उभारणार आहे. आतापर्यंत किती नुकसानीचे पंचनामे झाले आणि मदत कधी मिळणार, याची माहिती सरकारने स्पष्ट करावी.’

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सुषमा अंधारे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, प्रवीण काकडे, अस्मिता गायकवाड, अनिल ननवरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी पाऊस नसल्याने नुकसान झाले आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, आमच्या बोरामणी भागात एखादी शेतकऱ्यांला त्याचा फायदा झाला नाही. सरकारने दुष्काळी मदत जाहीर केली असली, तरी ती शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- मल्लिनाथ पटणे (शेतकरी, बोरामणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news