

सोलापूर : प्रसिध्द न्युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्मत्येप्रकरणी संशयीत आरोपी मनीषा मुसळे-मानेवर 22 जून पर्यंत दोषनिश्चिती करु नये असा आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने दिला.
या खटल्यात दोषमुक्त करावे असा अर्ज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात मनीषाने दिला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. या आदेशाविरोधात मनीषाने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचकडे धाव घेत ॲड. प्रसाद पी. कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत रिव्हिजन अर्ज दाखल केला. या अर्जाची सुनावणी न्यायाधिश प्रवीण पाटील यांच्या कोर्टात झाली. त्यानंतर न्यायालयाने मनीषावर 22 जून 2026 पर्यंत दोषनिश्चिती न करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, शुक्रवारी ( दि. 15) सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीवेळी ॲड. प्रशांत नवगिरे यांनी उच्चन्यायालयाचा आदेश दाखल केला. त्यामुळे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीसाठी 16 जून तारीख दिली.