Dr. Shirish Valsangkar Death Case: सीडीआरमधून सत्य बाहेर येणार का?

वळसंगकर कुटुंबासह आठ जणांचे चार महिन्यांचे सीडीआर अखेर न्यायालयात दाखल झाले आहेत
Dr. Shirish Valasangkar Death Case |
Dr. Shirish Walsangkar Death casePudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : वळसंगकर कुटुंबासह आठ जणांचे चार महिन्यांचे सीडीआर अखेर न्यायालयात दाखल झाले आहेत. संशयित आरोपीच्या वकिलांनी हे सीडीआर मागितले होते. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला होता.

या खटल्यांतील संशयित आरोपी मनीषा माने-मुसळे हिचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. डॉ. शिरीष, वळसंगकर कुटुंबियांसह आठ जणांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकार पक्षाने सीडीआर आणि लोकेशन देण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी (दि. 20) उरलेल्या तिघांचे सीडीआर न्यायालयात जमा झाले. डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होती.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मोहिते यांची विशेष न्यायाधीश म्हणून अंतर्गत बदली झाली. त्यामुळे हा खटला प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात चालणार आहे. पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news