Dr. Shirish Valsangkar Death Case: डॉ. शोनालीने दिले होते पोलिसांना पत्र

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या मृत्यूच्‍या वर्षभरानंतर त्‍यांच्‍या कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला
Dr Shirish Valsangkar Case
Dr Shirish Valsangkar Case
Published on
Updated on

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या वर्षभरानंतर त्‍यांच्‍या कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला आहे. आत्‍महत्‍या झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या सून डॉ. शोनाली वळसंगकर यांनी हॉस्‍पिटलमध्ये येण्या पूर्वी पोलिसांना पत्र दिल्याचे समोर आले. त्‍यानंतर त्‍या हॉस्‍पिटलमध्ये गेल्या आणि सुजय फडेक यांच्‍यासोबत त्‍यांचा वाद झाला. या वादाचे मूळ कारण वेगळेच असल्याची चर्चा हॉस्‍पिटलच्‍या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वळसंगकर रुग्णालयातील घरात जाण्यावरुन डॉ. शोनाली व डॉ. शिरीष यांचे जावई सुजय फडके यांच्‍यात वाद झाला. त्‍यांच्‍यातील भांडण मारामारीपर्यंत पोहचले. डॉ. वळसंगकर रुग्णालय ही खासगी मालमत्‍ता आहे यामध्ये डॉ. शोनाली यांचा काही संबंध नाही त्‍यांनी इथे येऊ नये असे सुजय फडके यांनी सांगितले. तर मी या घरची सून आहे त्‍यामुळे मी इथे येणारच असा रेटा डॉ. शोनाली यांनी लावला.

दरम्‍यान, डॉ. शोनाली यांनी हॉस्‍पिटलमध्ये जाण्या अगोदर पोलिसांना पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पत्रात कोणत्‍या बाबी नमूद होत्‍या याचा तपशील मिळू शकला नाही; परंतु डॉ. शोनाली यांनी संपूर्ण तयारी करुन हॉस्‍पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे यावरुन दिसते. तेथे गेल्यावर वाद होणार याची जाणीवही डॉ. शोनाली यांना होती त्‍यामुळे त्‍यांनी लागलीच पोलिसांना पाचारण केले.

त्‍यानंतर पुन्‍हा १५ पानी लेखी तक्रार पोलिसांना दिली. डॉ. शोनाली आणि सुजय फडके यांच्‍यातील वादाला वेगळे कारण असल्याची चर्चाही हॉस्‍पिटलच्‍या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. आता दोन्‍ही बाजूंनी तक्रारी दाखल असल्या तरी अद्याप गुन्‍हे दाखल झालेले नाहीत. वळसंगकर कुटुंबातील वाद आता चव्‍हाट्यावर येत असून, त्‍याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news