Dr. Mandakini Amte: डॉ. आमटे यांना विद्यापीठाचा अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान

सोलापूर विद्यापीठाचा सातवा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा
Dr. Mandakini Amte
Dr. Mandakini Amte: डॉ. आमटे यांना विद्यापीठाचा अहिल्यारत्न पुरस्कार प्रदानPudhari
Published on
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनाचे आणि अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना पहिला ‌‘अहिल्यारत्न‌’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, नाशिक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, भामरागडच्या दुर्गम भागात काम सुरू केले तेव्हा रस्ते, वीज, पाणी यांसारख्या प्राथमिक सुविधांचाही अभाव होता. आदिवासी बांधवांची भाषा वेगळी होती आणि आरोग्यसेवेची कोणतीही साधने नव्हती. मात्र, सातत्याने दिलेल्या प्रामाणिक सेवेमुळेच त्यांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकले. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अनिल घनवट यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमामुळे विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नामविस्तार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन, निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news