

बार्शी : शेअर मार्केटमध्ये दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आम्ही दाखवून बार्शी येथील एका डॉक्टरला 52 लाख रुपयाला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.
संदीप दिलीप वायचळ (रा.अध्यापक कॉलनी, कुर्डुवाडी रोड, बार्शी) असे फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डॉ. मिलिंद विभीषण चौधरी (वय 39, रा. फुले प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वायचळ हे इन्कम टैक्स भरण्याचेे काम करतात. त्यामुळे चौधरी यांची व त्यांची चांगली ओळख झाली होती. वायचळ यांनी सांगितले की, मी शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवतो व दोन ते तीन महिन्यात गुंतवलेले पैसे दुपटीने तिपटीने कमावतो.
तुम्हाला दरमहा 10 टक्के नफा कमाऊन देतो असे चौधरी यांना सांगितले. त्यानुसार शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला 5 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर पुणे येथील एका कंपनीच्या 10 लाख गुंतविण्यास सांगितले. मोनार्क ट्रेडिंग ॲपचा सुध्दा ब्रोकर व एजंट 40 लाख रुपये अँपच्या अकाउंटवर पाठविण्यास सांगितले. सुरुवातीला 3 लाखांचा परतावा म्हणून वायचळ याने डॉ. चौधरी यांना 3 लाख रुपये ऑनलाईन पाठवले.
काही दिवसांनी वायचळ याने पैसे देणे बंद केले. डॉ. चौधरी यांची 52 लाखांची फसवणूक झाली. पैसे मागितल्यास आत्महत्या करेन व तुला केसमध्ये गुंतवेन अशी धमकी वायचळ याने डॉ. चौधरी यांना दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.