Shri Vitthal Rukmini Temple : दीपावलीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

भाविकांसाठी विद्युत रोषणाई आकर्षण ठरत आहे
Vitthal Rukmini Temple
Vitthal Rukmini Temple
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : दीपावली सणांच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच भक्तनिवास या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला असून, भाविकांसाठी विद्युत रोषणाई आकर्षण ठरत आहे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली महोत्सव धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. वसुबारसपासून दीपावली महोत्सवास प्रारंभ झाला असून, या मंगलपर्वानिमित्त श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता तसेच परिवार देवतांना परंपरेनुसार विविध आकर्षक व मौल्यवान पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व तेजस्वी दिसत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या अलंकारांचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

दीपावली हा प्रकाशाचा, मांगल्याचा व आनंदाचा सण असल्याने मंदिर परिसरातही उत्सवाचे विशेष वातावरण निर्माण करण्यात आले आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा या सणांच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दीपावलीच्या मंगलपर्वात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे पारंपरिक पोशाख व अलंकारांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सुलभ व सुव्यवस्थित दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.