

सोलापूर : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत, पैलवान कै. मारुती चव्हाण- वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, (उपकंपनी) तसेच राजे उमाजी नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ मुख्य कंपनी सोलापूर या कार्यालया मार्फत विविध योजना राबविल्या जात असून, संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिर्हे यांनी केले आहे.
कार्यालयामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. सन 2025-26 या आर्थिक वर्षात व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील, कर्जाचे हप्ते नियमित पणे भरल्यास कमाल 12 टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरूपाची आहे. ऑनलाइन योजनेअंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावे लागणार आहे. महामंडळाचे सोलापूर जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे माहिती उपलब्ध आहे.