

सोलापूर : भारतीय रेल्वे विभागाने ऑल-इन-वन सुपर ॲप या रेलवन प्रणाली (ॲप) द्वारे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहित करण्यासाठी व प्रवाशांना चांगल्या प्रकारे सोय मिळावी, याकरिता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल रेलवन ॲपमुळे प्रवाशांना अनारक्षित तिकीट बुकींग केल्यावरही प्रवाशांना तीन टक्केचीही सवलत 14 जुलैपर्यंत मिळणार आहे.
रेलवन ॲपवरील आर-वॉलेटद्वारे अनारक्षित तिकिटे बुकींग करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना कॅशबॅक या प्रणालीद्वारे तीन टक्के (3%) बोनस देेणार आहे. ही डिजिटल बुकींग पद्धतीचा जास्तीत जास्त प्रसार प्रचार होण्यासाठी व कॅशलेस पेमेंट पद्धतीला प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेलवन ॲपवर उपलब्ध असलेल्या आर-वॉलेट वगळता इतर सर्व डिजिटल पेमेंट पद्धतींद्वारे केलेल्या अनारक्षित तिकिटाची बुकींग केल्यासही सवलत मिळेल. रेलवन ॲपवर आर-वॉलेट व्यतिरिक्त इतर डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करून बुकींग केलेल्या अनारक्षित तिकिटांवर सवलत सहा महिने लागू राहील, याचा प्रवाशांना फायदा मिळेल व एक अखंड, जलद सेवा मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
स्मार्ट ॲप, प्रवासी-केंद्रित डिजिटल उपाय प्रदान
रेलवन ॲप हे स्मार्ट ॲप असून ते सुरक्षित व प्रवासी-केंद्रित डिजिटल उपाय प्रदान केले आहे. प्रवाशांना या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांद्वारे त्रासमुक्त अनारक्षित तिकीट बुकिंगचा अनुभव घेण्यासाठी रेलवन ॲप उपयुक्त राहील.