Dharmapuri village: मॉडेल शाळा बनविण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार

ग्रामपंचायतीस दिला चार लाखांचा धनादेश : धर्मपुरीत होणार मॉडेल शाळा
Dharmapuri village
Dharmapuri village: मॉडेल शाळा बनविण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकारPudhari
Published on
Updated on

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे शाळा मंजूर झाले. त्या बांधकाम चांगले होऊन ही शाळा एक मॉडेल ठरावे, यासाठी ग्रामस्थ आणि पुणे येथील केल्फोस फाउंडेशनच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीस चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. त्यामुळे धर्मपुरीत आता मॉडेल शाळा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धर्मपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या नवीन इमारत बांधकामाला गती देण्यासाठी ग्रामस्थ व पुणे येथील केल्फोस फाउंडेशनच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माळशिरस येथील पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत मॉडेल शाळा डिझाईननुसार बांधकामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची रक्कम ग्रामपंचायतीकडे सुर्पद करण्यात आला आहे.

बैठकीत ग.वि. अधिकारी रघुनाथ पांढरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी ग्रामसेवक सुरेश निंबाळकर यांना धनादेश सुपूर्द करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ग्रामसेवक निंबाळकर यांच्या अतिरिक्त लागणाऱ्या धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटोळे, ग्रामस्थ दत्तात्रय झेंडे, केल्फोस फाउंडेशनचे संदीप वाघ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news