Dhairyashil Mohite Patil: मोहिते पाटलांच्या त्या ऑडिओ क्लिप बाबत पोलिसांच्या कारवाईकडे नागरीकांचे लक्ष

सोलापूर जिल्ह्यात कुठलीही दादागिरी चालू देणार नाही अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका
Dhairyashil Mohite-Patil
Dhairyashil Mohite-PatilPudhari
Published on
Updated on

सोलापूर : खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पंचायत समितीतील एका अधिकाऱ्यामधील कथित दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात कुठलीही दादागिरी चालू देणार नाही अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही भूमिका घेतली आहे. दरम्यान, आता मोहिते पाटील यांच्या या क्लिप बाबत पोलीस प्रशासन कुठली कारवाई करते याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि कोणत्याही प्रकारची दादागिरी किंवा दबाव प्रशासनावर चालणार नाही. त्यांनी संबंधित प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे पालकमंत्री गोेरे यांनी आश्वासन दिले आहे. या प्रकरणात पोलिसांना दोषींवर कारवाई करण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद उप अभियंता मुलाणी यांच्याबाबत जुने बातम्यांचे कात्रणे व अन्य कागदपत्रे सोशल मीडिया वरून व्हायरल करत ट्रोल केले जात आहे. त्यातून त्यांच्या समर्थक कार्यकर्ते म्हणून आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे.

गेल्या दोन वर्षापासून मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक हल्ले सुरू असून एकमेकांना राजकीय कोंडीत पकडण्याचा एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे दरम्यान मोहिते पाटील यांच्या ऑडिओ क्लिप वरती आता पोलीस प्रशासन कुठली कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news