Solapur News : मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडा

कुंभारझरी येथील ग्रामस्थांची जिल्हा परिषदेकडे मागणी
Solapur News
Solapur News : मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडाfile photo
Published on
Updated on

Demolish dilapidated classrooms

टेंभुर्णी, पुढारी वृनसेवा : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील जिल्हा परिषद केंद्रिय उच्च प्राथमिक शाळेतील पडीत असलेल्या वर्गखोल्यामुळे शाळेत साप, विचू निघण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांना तातडीने पाडण्यात याव्या. नसता ग्रामस्थांना पाडण्याची परवानी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Solapur News
School News : आज शाळा गजबजणार, पुष्पगुच्छाने स्वागत

कुंभारझरी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव व दुर्घटना टाळण्यासाठी अशा धोकादायक वर्गखोल्या तातडीने पाडणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यत वर्ग असून ११७विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यासाठी पाच शिक्षक कार्यरत आहे.

या शाळेतील इमारत मोडकळीस आल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीने बांधलेल्या नवीन इमारतीच्या अगदी शेजारीच जुन्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या आहेत. जुन्या खोल्यांमध्ये घाण साचल्याने साप, विंचू व इतर वन्यप्राणी सर्रास आढळून येत आहेत. खडकपूर्णा नदीच्या पात्राशेजारी असलेल्या या शाळेसाठी ग्रामपंचायतीने नवीन खोल्यांचे बांधकाम केले. मात्र जुन्या, पडीक खोल्या पाडण्याची परवानगी जिल्हा परिषद जालनाकडून अद्याप मिळालेली नाही.

Solapur News
पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला आग

त्यामुळे नवीन इमारतीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या खोल्यांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. जुन्या खोल्यांमध्ये कचरा व घाण साचल्याने साप, विंचू व इतर सरपटणारे प्राणी आढळून येतात. कधी हे प्राणी नवीन वर्गात येतील याची शाश्वती नाही. पावसाळ्यात जुन्या खोल्यांचे छत कधीही कोसळण्याची भीती आहे.

तसेच पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्गखोल्या पाडण्याची परवागी तातडीने देण्यात यावी, नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजयुमोर्चाचे तालुका अध्यक्ष विजय परिहार, ग्रामपंचायत सदस्य भगवान चव्हाण, सुनील चव्हाण, अजय पैठणे, शरद चव्हाण, संतोष माळी, परमेश्वर चिंधोटे, शंकर चव्हाण आदीनी दिला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाची दिरंगाई

ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेत ठराव पारित करून जुन्या खोल्या पाडण्याची परवानगी मागितली. हा प्रस्ताव जाफराबाद गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेकडे पाठवला. मात्र, जि.प.च्या दुर्लक्षामुळे प्रस्ताव धूळखात पडून आहे.

आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन मोडकळीस आलेल्या खोल्या पाडण्यासाठी परवानगी मागितली. जाफराबाद गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव देऊनही जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको. तातडीने परवानगी द्यावी.
- विजय परिहार, तालुका अध्यक्ष, भाजयुमोर्चों

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news