Solapur News : दुष्काळामुळे जंगलातील फळझाडांचा होत आहे ऱ्हास

वन्य प्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
Solapur News
दुष्काळामुळे जंगलातील फळझाडांचा होत आहे ऱ्हास
Published on: 
Updated on: 

गणेश गोडसे

बार्शी : बार्शी तालुक्यात जंगलाचे मोठे क्षेत्र आहे. विशेषतः, पांगरी, उक्कडगाव, चिंचोली परिसरात डोंगररांगा आणि वनक्षेत्र पसरलेले आहे. या जंगलात पूर्वी चिंच, बोर, जांभूळ, आंबा, सीताफळ, बेल, करवंद, चारोळी, मोह अशी नैसर्गिक फळझाडे मोठ्या प्रमाणात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत व चालू वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे या फळझाडांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून, त्याचा थेट परिणाम वन्य प्राण्यांच्या जीवनावर होत आहे.

बार्शी तालुक्याच्या जंगलात वाघ, कोल्हा, लांडगा, ससा, रानडुक्कर, मोर, हरीण, तरस, खोकड, बिबट अशा वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. पक्ष्यांमध्ये पोपट, मैना, कोकिळा, भारद्वाज, घुबड यांचे वास्तव्य आहे. या सर्व प्राण्यांचे मुख्य अन्न जंगलातील फळे, पाने, बिया आणि कंदमुळे हेच आहे. मात्र फळझाडे कमी झाल्याने त्यांच्या अन्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

इंधनासाठी आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. जमिनीवरील पाला पेटवला जातो, त्यात अनेक लहान रोपे जळून जातात. जंगलात जनावरांची अनियंत्रित चराई आणि अतिक्रमामुळे नैसर्गिक पुनरुत्पादन थांबले आहे. अन्नाच्या शोधात वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे वळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.