

Sawatgavhan house robbery case
माळीनगर : माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील मौजे सवतगव्हाण येथे सोमवार (दि.०५) मे रोजी दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घटना घडली. याबाबत फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार ०५ मे रोजी दयानंद रामदास जाधव, (वय 39) धंदा नोकरी, रा. सवतगाव ता. माळशिरस, जि. सोलापूर हे वरील ठिकाणी पत्नी माधुरी व मुलासह राहण्यास असुन आर.बी.एल.बैंक शाखा अकलुज येथे असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरी करित असुन त्यावर कुटुंबाची उपजिवीका भागवितात.
दि. 0५ मे रोजी सकाळी १० या वेळेत ते नेहमीप्रमाणे बँकेत कामावर गेले. त्यानंतर पत्नी माधुरी ही मुलास सोबत घेऊन सवतगाव ता माळशिरस येथील राहत्या घराला कडी कोयंडा कुलूप लावुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पतीचा जेवणाचा डबा घेऊन अकलुज येथील बँकेत गेली. दयानंद जाधव आणि त्यांच्या पत्नी दोघे बॅंकेत एकत्र असताना शेजारी राहणार्या महिलेने फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ११:४५ वाजता फोन करुन तुमच्या घराचा दरवाजा उघडुन कोणीतरी आत जावून काहीतरी घेवुन दोन मुले मोटारसायकलवरुन निघुन गेली आहेत, असे कळविले.
नंतर दोघेही लागलीच घरी आले असता घराचा कडीकोयंडा तोडुन कोणीतरी आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. घरातील लोखंडी कपाट उघडे पाहिले असता त्यातील कपड़े व इतर वस्तु अस्थाव्यस्थ पडलेल्या दिसल्या.
१,६०,०००/- रु. किंमतीचे ०४ तोळा वजनाचे गळ्यातील सोन्याचे गंठण, ७२,०००/-रु. किंमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ,४०,०००/-रु. किंमतीचे ०१ तोळा वजनाचे सोन्याचे मिनीगंठण, १२,०००/- रु. किंमतीचे ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुसी ,४०,०००/- रु. किमतीचे ०१ तोळा वजनाची कानातील सोन्याची फुले, १२,०००/-रु.किमतीचे ०३ ग्रॅम वजनाचे त्यात सोन्याचे ०४ मणी व एक डोरले, १, ०००/-रु. किमतीची दोन भार वजनाची चांदीची ०४ जोडवी २, ०००/-रु. चार भार वजनाचे चांदीचे ०२ करदोडे व ०२ वाळे असा एकूण ३,३९,००० /- रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे फिर्यादी दयानंद जाधव यांनी फिर्यादीत सांगितले आहे.
दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय योगेश लंगोटे आणि पथक करीत आहेत. त्यांनी आज फिर्याद दाखल झाली असून त्यातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.