Crop insurance: पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

जिल्ह्यासाठी 41 कोटी 45 लाख रुपये मंजूर
Crop Insurance
Crop Insurance Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : यंदाच्या वर्षी पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असून, अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरुनही वगण्यात आले आहे. बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर या तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही त्यांच्या पदरी निराशाच आलली आहे. तर मंगळवेढा, माढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळाला आहे. जिल्ह्यासाठी 41 कोटी 45 लाख रुपये पीक विमा मंजूर झाले आहे.

सन 2025 मध्ये खरिप हंगामातील अतिवृष्टी महापूर यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीके वाहून गेली. परंतू पिक विमा कपंन्याने निकषात बदल केल्याने पिक कापणी प्रयोगामुळे त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामाची जिल्ह्यात आतापर्यंत मूग, बाजरी, तूर, कांदा व सोयाबीन या पिकांची नुकसानभरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे. परंतू मागील वर्षातील खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन पिकाला यंदा पीक विमा कंपनीने डावलल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

मागील खरीप हंगामात जिल्ह्यात 1 लाख 36 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मुसळधार पावसाने सोयाबीन हाती लागले नव्हते. मात्र, पीक विमा कंपनीनेही सोयाबीनची नुकसानभरपाई मंजूर केली नाही. मागील वर्षी विमा हप्त्याची 153 कोटी 19 लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीला जमा झाली होती. त्यामध्ये मंगळवेढा तालुक्याची विमा हप्त्याची रक्कम 1 कोटी 24 लाख तर माढा तालुक्याची एक कोटी 59 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाली होती.

पीक विमा कंपनीकडून मंगळवेढ्याला 11 हजार 433 शेतकऱ्यांना 17 कोटी 99 लाख रुपये तर माढा तालुक्यातील 14 हजार शेतकऱ्यांना 7 कोटी 6 लाख रुपये मंजूर झाले आहेत.यंदा पीक विमा कंपनीकडून कांद्याला सर्वाधिक नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यासाठी 42 हजार 797 शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या 41 कोटी 46 लाख रुपयांपैकी कांद्यासाठी 20 हजार 569 शेतकऱ्यांना 29 कोटी 66 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस व माढा तालुक्यांना कांद्याची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news