Solapur court news: फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या 72 तासांपूर्वी नोटीस द्या

न्यायालयाचे सोलापूर पोलिसांना आदेश
Court
CourtPudhari
Published on
Updated on

सोलापूर : फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी दाखल केलेल्या अपीलावर न्यायालयाने गुन्हा दाखल करायचा असल्यास त्याच्या 72 तास अगोदर संशयीतास नोटीस देण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले.

सागर भास्कर थोरात (वय 32,रा. रेल्वे लाईन्स, सोलापूर) यांच्या विरोधात आर.एल. रणशृंगारे यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन अटक होईल यासाठी सागर थोरात यांनी ॲड. शशी कुलकर्णी यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.

या सुनावणी दरम्यान संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी समक्ष हजर राहून अजून गुन्हा दाखल झालेला नसून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर ॲड. शशि कुलकर्णी यांनी, सदर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी 72 तासाची आगाऊ नोटीस देण्याची मागणी केली. सदरची मागणी विचारात घेऊन न्यायालयाने, रणशृंगारे यांच्या तक्रारीवरून सागर थोरात यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास, त्यांना 72 तासाची आगाऊ नोटीस द्यावी, असा आदेश शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला. या प्रकरणात सागर थोरात यांच्यातर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. देवदत्त बोरगांवकर, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, ॲड. आदित्य अदोने आणि सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news