

पोखरापूर : प्रेमप्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून 21 जणांनी मिळून मुलासह तिघांना एसटीपी पाईप व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे दि. 7 जुलै रोजी घडली.
मारहाण झालेल्या शरद नागनाथ थिटे (रा. नालबंदवाडी, ता. मोहोळ) याने फिर्याद दिली आहे. नातेवाईकांमधील महेश केशव माने, महेश अशोक चव्हाण, विनोद अभिमान गुंड, अश्विनी सज्जन माने, सुमन सिद्धेश्वर माने, शंकर हणमंत गुंड, नारायण कल्याण गुंड, महादेव सुग्रीव गुंड, राहुल अशोक चव्हाण, रोहित पोपट माने, वैभव सज्जन माने, सचिन पोपट दांडगे, सज्जन हणमंत माने, रणजित गोरख माने, समाधान प्रकाश भिसे, किरण गोरख भिसे (सर्व रा. नालबंदवाडी, ता. मोहोळ), मोहन बबन गुंड, औदुंबर महादेव गुंड, विशाल तुळशीराम गुंड, निलेश बळीराम गुंड, ऋषिकेश मारुती गुंड (रा. खंडोबाचीवाडी, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.