

सोलापूर : सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. याचा निषेध करीत सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने याबाबत बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाला निवेदन देण्यात येणार आहे.
देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.7) तातडीची सभा बोलावून या घटनेचा निषेध केला. बारचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव तसेच ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी अॅड. रविराज सरवदे, अॅड. संजय गायकवाड, अॅड. मळसिद्ध देशमुख, अॅड. व्ही. पी. शिंदे, अॅड. आकाश माने, अॅड. अजय रणशृंगारे, अॅड. बापूसाहेब देशमुख, अॅड. संजीव सदाफुले, अॅड. बापूसाहेब गायकवाड, अॅड. शरद पाटील, अॅड. भारत कट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. आभार खजिनदार अॅड. अरविंद देडे यांनी मानले.
बारने केला निषेधाचा ठराव
सोलापूर बार असोसिएशनने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. याचे निवेदन बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच बार कॉन्सिल ऑफ इंडिया यांना पाठविण्यात यावे असा निर्णय यावेळी घेण्यात आला. सर्व वकिलांनी सरन्यायाधीशांबद्दल आदर व्यक्त करत, न्यायसंस्थेच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.