

श्रीपूर : सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळतो. समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करणारे असे उपक्रम सातत्याने राबवले पाहिजेत, असे प्रतिपादन अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
युवक नेतृत्व कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग रमेश भोसले यांनी सलग चौथ्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. यंदा 10 वधू-वरांच्या जोड्यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नवदांपत्यांना बेड, भांडी, रॅक, मुलींसाठी सोन्याचे मंगळसूत्र तसेच वधू-वरांना सर्व कपडे व बूट आदी साहित्य मोफत देण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल बजरंग भोसले व त्यांचे वडील रमेश भोसले यांचे विशेष कौतुक शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील, ईश्वरीदेवी कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, संचालक रामचंद्र सावंत-पाटील, प्रकाश आप्पा पाटील, डॉ. एम. के. इनामदार, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, निशांत पाटील, नानासाहेब मुंडफणे, नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, अरूण तोडकर, नागेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र भोसले यांनी तर आभार प्रदर्शन संदीप लांडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नरेंद्र भोसले, राजनंद नाईकनवरे, अक्षय भगत, संदीप लांडगे, आदित्य परकाळे, गणेश चांदणे, अल्ताब मुलाणी, हरी अडगळे, महेश गायकवाड, हर्षवर्धन अल्हाट, ज्ञानेश्वर कांबळे, आबा वजाळे, रेहान मुलाणी, प्रवीण कारंडे, बाळा इंगळे, करण लांडगे, आकाश गोदे, सागर लांडगे आदींनी परिश्रम घेतले.