Vote counting dispute: उळे येथे मतमोजणीच्या वादातून परस्परांना मारहाण

परस्परविरोधी फिर्यादीतून 32 जणांवर गुन्हे दाखल
EVM Vote Counting
EVM Pudhari
Published on
Updated on

कासेगाव (ता. द. सोलापूर) : बोरामणी जिल्हा परिषद गटातील उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून 32 जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. या प्रकाराने उळे गावातील वातावरण संवेदनशील बनले होते.

दत्तात्रय त्र्यंबक खंडागळे (रा. उळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मतमोजणीच्या दिवशी (दि. 9 फेब्रुवारी) रात्री दहाच्या सुमारास उळे गावातील शिवाजीनगर परिसरात फिर्यादी व नानासाहेब शिंदे बोलत असताना 19 जणांचा गट अचानक तेथे आला. त्यांनी ‌‘तू नेताजी खंडागळे यांचा पोलिंग एजंट का झाला? त्यांना मतदान का केले?‌’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. दोघांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून या प्रकरणी श्रद्धा अमर धनके, अभिषेक सतीश खंडागळे, सुमित सुधीर धनके, मंथन बालाजी खंडागळे, विकास राजेंद्र खंडागळे, दिनेश जगन्नाथ शिंदे, कुसुम रामचंद्र धनके, महेश रमेश शिंदे, वैभव विनायक खंडागळे, संजय बाजीराव शिंदे, केशर सुधीर धनके, विष्णू रामचंद्र शिंदे, संकेत सुधीर धनके, रामचंद्र पंढरी धनके, सारिका महेश शिंदे, दिनेश रमेश शिंदे, महादेव श्रीमंत सोनटक्के, अमर रामचंद्र धनके व सुरज शिंदे (सर्व रा. उळे) अशा 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पी.एस.आय. महेश घोडके करीत आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

फटाक्यांची माळ घरात फेकल्याचा आरोप; 13 जणांविरुद्ध गुन्हा

आप्पा रामचंद्र धनके (रा. उळे) यांनी दिलेल्या फिर्यादीत निवडणुकीतील विजय साजरा करताना पेटती फटाक्यांची माळ त्यांच्या घराच्या अंगणात फेकल्याचा आरोप केला आहे. यात घरातील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. फिर्यादींच्या वडिलांनी ‌‘घरासमोर फटाके उडवू नका,‌’ असे सांगत असताना त्यांना व घरातील इतरांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी युवराज त्र्यंबक खंडागळे, नामदेव खंडागळे, दत्तात्रय खंडागळे, नानासाहेब शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, महेश ननवरे, गणेश कोल्हे ,प्रथमेश खंडागळे, रोहन गुंड, यशवंत खंडागळे, तुकाराम गुंड, आदित्य खंडागळे व राहुल खंडागळे (सर्व रा. उळे) अशा 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार रशीद बानेवाले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news