Solapur Gutkha sale complaints: गुटखा-मावा विक्रीविरोधात नागरिक सरसावले; ६० हून अधिक तक्रारी

शहरात मावा, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला आता नागरिकांचीही साथ मिळू लागली आहे
Solapur Gutkha sale complaints
Solapur Gutkha sale complaints
Published on
Updated on

सोलापूर : शहरात मावा, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला आता नागरिकांचीही साथ मिळू लागली आहे. दै. ‘पुढारी’ने गुटखा-मावा विक्री आणि अन्नभेसळीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या टोल-फ्री क्रमांकाची माहिती प्रसिद्ध केल्यानंतर जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. आतापर्यंत ६० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात मावा, गुटखा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाया सुरू आहेत. तरीही सोलापूर शहरात काही ठिकाणी चोरीछुप्या पद्धतीने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचा प्रकार दै. ‘पुढारी’ने समोर आणला. याविरोधात नागरिकांनी आता थेट तक्रारी नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची पुढील सात दिवसांत तपासणी करून त्यावर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरात अन्न व औषध प्रशासनाची नऊ पथके तैनात करण्यात आली असून ती नियमितपणे फिल्डवर जाऊन पाहणी व कारवाई करत आहेत. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे गुटखा-मावा विक्रेत्यांवर अधिक प्रभावी अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news