आषाठी वारीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाखरी ते पंढरपूर पालखी सोहळ्यासोबत चालणार
Chief Minister will participate in Ashadhi Wari!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाखरी ते पंढरपूर पालखी सोहळ्यासोबत चालणार File Photo
Published on
Updated on

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यंदा वाखरी ते पंढरपूर पालखी सोहळ्या सोबत चालणार आहेत. तसेच येत्या १२ ते १४ या दरम्यान त्यांची यात्रा नियोजनाची पाहणी भेट कधीही होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिली.मंगेश चिवटे शुक्रवारी (दि.5) पुणे विभागीय आयुक्तांसोबत पालखी महामार्ग आणि पंढरपूर शहरातील यात्रा नियोजन पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Chief Minister will participate in Ashadhi Wari!
आषाढी पायी वारी सोहळा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज पालखीचे 29 जूनला प्रस्थान

यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की, आषाढी यात्रा नियोजनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, निर्मल यात्रा, आरोग्य दायी यात्रा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यात्रा काळात भाविकांना पाणी पुरवठा, महाप्रसाद वाटप, चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री या दरम्यान कोणत्याही क्षणी यात्रेच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट देतील, तसेच पालखी सोहळ्या सोबत चालण्याचे त्यांचे नियोजन आहे, असेही चिवटे यांनी सांगितले. दरम्यान माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर वाखरी ते पंढरपूर पालखी सोहळ्या बरोबर पायी चालणारे शिंदे हे दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news