Pandharpur chaitri yatra: चैत्री यात्रेसाठी पंढरीत भाविकांची मांदियाळी

चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार दि. 29 मार्च रोजी लाखो वैष्णवांच्या उपस्थित साजरा होत आहे
Pandharpur chaitri yatra
Pandharpur chaitri yatraPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार दि. 29 मार्च रोजी लाखो वैष्णवांच्या उपस्थित साजरा होत आहे. दशमी दिवशी सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शन रांगेतही लाखावर भाविक उभे आहेत.

दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. दर्शन रांगेत त्याचबरोबर मंदिर परिसरात शेडनेटची सावली तयार करण्यात आल्यामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढते तापमानामुळे भाविकांची संख्या घटली आहे. यातच शिखर शिंगणापूरची देखील यात्रा सुरु असल्याने भाविक विठ्ठलाचे दर्शन घेवून शिखर शिंगणापूरला जात असल्याने पंढरपूरची चैत्री वारी धावती वारी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, चैत्री शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात करण्यात येणार आहे. चैत्री यात्रा सोहळा पार पाडण्यासाठी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले प्रयत्नशील आहेत. सध्या काढणीचे, सुगीचे दिवस आहेत. उन्ह वाढत आहे. अवकाळी पावसाची भिती आहे. असे असले तरी एकादशी दिवशी 5 लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर) यांनी व्यक्त केला आहे.

चैत्री एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे कामदा एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलू लागले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. स्नानानंतर श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये तिसऱ्या शेडमध्ये पोहचली आहे. या दर्शन रांगेत एक लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी दशमी, एकादशी व व्दादशीला लिंबू सरबत, तांदळाचा, शाबुची खिचडी, पाणी, आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तर श्रींचा प्रसाद बुंदी लाडू प्रसादाची विक्री सुरु आहे. पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम सुरु आहे. तर आरोग्य विभाग देखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.

भाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून 1272 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, 65 एकर व शहरातील महत्वाच्या ठिकाणी मंदिराचे व पोलीस स्टेशनचे मिळून 250 सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news