

सोलापूर : आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकातील इयत्ता आठवीत शिक्षण घेणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून वर्षाला 12 हजार रुपयेची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषद ही यंदा 21 डिसेंबरला परीक्षा घेणार आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठीच ही योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 11 आक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीच्या परीक्षेत 55 टक्के गुणाची अट असून पालकांचेे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख 35 हजार रुपयांहून अधिक नसावेत. हे आर्थिक व गुणात्मक निकष आहेत. यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडावे लागेल.
हे राज्य परीक्षा परिषदेकडून घेषित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर येत्या 21 डिसेंबरला घेतले जाणार आहे. या परीक्षेचा निकाल नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील दुसर्या आठवड्या पर्यंत जाहीर होते. विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता व शैक्षणिक अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अनुदानीतसह विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयातील आणि जवाहर नवोदय विद्यालयासह वसतिगृहातील सवलतीचा लाभ घेणारे व तसेच सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी परीक्षा देता येते.
20 गुणांची परीक्षा
बौद्धिक व शालेय क्षमता प्रत्येकी 20 गुणांची ही परीक्षा पद्धत असणार आहे. शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची आहे. विद्यार्थी व पालक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल भरण्याची नियमित शुल्कासह 11 ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत एखाद्या विद्यार्थ्याला अर्ज भरणे जमले नाही, तर तो जादा विलंब शुल्कासह 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरू शकतात.