सोलापूर : विजय थोरात
अलीकडे रेल्वेगाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीसाठी व अपघात रोखण्यासाठी रेल्वेस्थानकांच्या स्टार्टर्स (होम) सिग्नलच्या दोन्ही बाजूने सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
यामुळे गाडी स्थानकात येताना व स्थानकातून बाहेर जाताना रेल्वेचे डबे, मालवाहतुकीच्या वॅगनमध्ये काही विघाड असल्यास ते तत्काळ शोधून त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. सोलापूर विभागातील दहा स्थानकांवर लवकरच या सुबिधा दिल्या जाणार आहेत.
यामुळे रेल्वेचे संभाव्य अपघात रोखण्यास सीसीटीव्हींची मदत होणार आहे. दरम्यान, रेल्वेचे कर्मचारी पेट्रोलिंग करुन अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्नशील असले तरी रेल्वेचे विस्तारलेले नेटवर्क पाहता प्रत्येक ठिकाणी सुरक्षायंत्रणा उभारणे आणि प्रत्येक वेळी नजर ठेवणे अशक्य आहे. यामुळे सोलापूर विभागाने यावर आता रेल्वेच्या होम सिग्नलवरच दोन्ही बाजूने सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव वनविला आहे.
याला मंजुरी मिळताच विभागातील दहा रेल्वेस्थानकांवर हे सीसीटीव्ही लावण्यात येतील. याचा सर्वाधिक फायदा मेल, एक्स्प्रेस व मालवाहतूक करणाऱ्या गाडधांना होईल. मालवाहतूक गाड्यांच्या बॅगनमध्ये बऱ्याचदा बिघाड होतात. कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेमुळे अनेकदा अपघात टळले आहेत, पण यात आणखीन सुरक्षितता येण्यासाठी स्थानकाच्या होम सिग्नलवरच याची पडताळणी होईल आणि अपघात रोखण्यास मदत होईल.
मालगाडीच्या वॅगनचे दरवाजे उघडे असल्यास अपघात होण्याची शक्यता असते. बॅगमधील स्वच्छता केली आहे. की नाही तसेच मालगाडीवर बऱ्याचदा ताडपत्री झाकण्यात येते. ती व्यवस्थित आहे की नाही यावर या माध्यमातून लक्ष असेल. मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांवरदेखील सीसीटीव्हीची नजर असेल. या सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण प्रत्येक स्थानकावर स्टेशन मास्तर यांच्या ऑफिसमध्ये असेल,
सोलापूर विभागातील जवळपास दहा रेल्वेस्थानकाच्या स्टार्टर्स सिग्रलवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. जेणेकरुन स्थानकात येताना आणि बाहेर जाताना रेल्वेगाडी वर लक्ष असेल. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर