Solapur News: अडीच हजार श्री सदस्यांनी केली 60 एकरावरील जागेची स्वच्छता

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम
Solapur News
Solapur News: अडीच हजार श्री सदस्यांनी केली 60 एकरावरील जागेची स्वच्छताPudhari
Published on
Updated on

सोलापूर : रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये व स्मशानभूमीमध्ये सुमारे अडीच हजार श्री सदस्यांनी एकाचवेळी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता मोहिम घेतली. 2687 श्री सदस्यांनी 60.26 एकर जागेवर स्वच्छता मोहिम राबविली. यातून 7277 किलो ओला कचरा, 1, 10, 801 किलो सुका कचरा असे एकूण 1, 18, 078 किलो कचरा संकलित करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने 1 मार्च रोजी सोलापुरात ही मोहिम घेण्यात आली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास 25 ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news