

दक्षिण सोलापूर : वळसंग पोलिस ठाण्यात गणपती मिरवणुकीत डीजे आणि लेसर लाईट वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आहेरवाडी रस्त्यावर औष्णिक ऊर्जा प्रकल्पातजवळ गणपतीची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये डीजे साऊंड सिस्टिम आणि लेसर लाईट वापरण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिस शिपाई शंकरराव पाटील यांच्या फिर्यादीवरून राम भीमराव माने, विनायक गुरशांत तळवार दोघे राहणार तोळनूर ता. अक्कलकोट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन मिरवणुकीत वापरण्यात आलेले डीजे सिस्टम आणि टेम्पो जप्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक संतोष चव्हाण हे करीत आहेत.