

टेंभुर्णी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पाच जणांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली.
निखील सुधीर लांडगे (रा. दहिवली ता. माढा), अमोल गरड, शाहिद मुलाणी (दोघे रा. उपळवाटे ता.माढा) संगीतराव (रा. टेंभुर्णी ता.माढा), तात्या शामराव जगताप (रा. दहिवली ता.माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मे 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत आरोपी निखील लांडगे याने पीडितेचा पाठलाग करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली.
आरोपी अमोल गरड, शाहिद मुलाणी, संगीतराव (रा. टेंभुर्णी ता.माढा), तात्या जगताप यांनी निखील लांडगे याच्या सोबत येऊन पीडितेस रस्त्यावर आडवून तिच्या शरीरास झोंबाझोंबी केली. अधिक तपास सहा.पोलिस अधिक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. या करीत आहेत.
टेंभुर्णी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल
माढा तालुक्यातील मौजे उपळवाटे येथे शेतातील कामाच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी चार जणांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अनु.जाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघे उपळवाटेचे राहणारे आहेत. अतुल भैरवनाथ खुपसे, अक्षय देवडकर, शरद सुभाष सपाटे (तिघे रा.उपळवाटे (ता.माढा) व निलेश पवार (रा.शिराळ (टें)) ता.माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक अंजना कृष्णा व्ही. एस या करीत आहेत.