Solapur Burglary Case: २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून घरफोडी उघड

२ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Solapur Burglary Case: २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून घरफोडी उघड
Published on
Updated on

सोलापूर : शेळगी परिसरातील बलदवा नगर येथील गौरी अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत अटक केली. चोरीतील ३७ ग्रॅम सोन्याचे, ४० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच घरफोडीसाठी वापरलेली कटावणी असा एकूण २ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरट्याने २४ ते २६ जूनदरम्यान बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरून नेले होते. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात झाली होती. पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांनी तपासाचे आदेश दिले होते. वपोनि अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मनोज मोरे यांच्या पथकाने सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपी हर्षद गुलाब पवार (वय ३२, रा. पिरंगुट, जि. पुणे) यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, स. पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि वपोनि अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोउनि मनोज मोरे यांच्यासह अंमलदार जावेद जमादार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, सुभाष मुंढे, वसिम शेख, काशिनाथ वाघे, अभिजित धायगुडे, सैपन सय्यद तसेच अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, शाम सुरवसे आणि मारुती घोरपडे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news