सोलापूर : चिखली येथे कुलुप फोडून घरफोडी

अज्ञात चोराने २ लाख ६४ हजारांचा माल केला लंपास
Burglary by breaking the lock at Chikhli
चिखली येथे कुलुप फोडून घरफोडीPudhai File Photo
Published on
Updated on

मोहोळ तालुक्यातील चिखली येथे बंद घराचा कुलुप तोडून घरफोडी करुन चोरी केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमध्ये चोराने कपाटाचे कुलूप तोडून १ लाख १७ हजार रुपयांच्या रोख रकमेसह १ लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने पळवले. यासोबतच वेगवेगळ्या देवतांच्या चांदीच्या प्रतिमा तसेच सीसीटीव्हीचे मशीन असे एकूण २ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा माल पळवून नेल्याची घटना गुरुवारी (दि.1) उघडकीस आली.

Burglary by breaking the lock at Chikhli
रत्नागिरी : कोंडगाव बाजारपेठेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील चिखली येथील धर्मराज महादेव पाटील हे शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करतात. पुणे येथील भोसरी एमआयडीसी येथे त्यांचे कॉपर ट्रेडिंग चे दुकान आहे. तिथे मुले राहतात पाटील हे अधून मधून गावाकडे ये जा करून मुक्कामी असतात. धर्मराज पाटील हे दि. २९ जुलै रोजी पुणे येथे मुलांकडे गेले होते. त्यांच्या वस्तीवर दररोज सायंकाळी गावातीलच दत्ता मते हे बाहेरची लाईट लावण्याचे व सकाळी बंद करण्याचे काम करतात. दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मते नेहमीप्रमाणे लाईट लावण्यासाठी वस्तीवर आले असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलपाचे कडीकोयंडे तोडलेले दिसले, तसेच आतील सर्व दरवाजांचे कोयंडे तोडलेले होते.

Burglary by breaking the lock at Chikhli
देवळा येथे भरदिवसा 12 लाखांची घरफोडी

घरातील कपाटाचे लॉक तोडून आतील समान अस्ताव्यस्त फेकलेले होते. त्यांनी याबाबत तात्काळ धर्मराज पाटील यांना फोनवरून माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी धर्मराज पाटील हे शुक्रवारी (दि.2) ऑगस्ट रोजी चिखली येथील घरी आले असता, त्या ठिकाणी पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चासाठी ठेवलेली १ लाख १७ हजारांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने व चांदीच्या देवांच्या प्रतिमा तसेच ६ हजार ५०० रुपये किमतीचा सीसीटीव्ही चा डीव्हीआर मशीन असे एकूण २ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news