Holi Festival: बुरा ना मानो होली है, भाई होली है

राजकारणाच्या नव्या रंगातून पुन्हा नवे चेहरे उदयास येतात. राजकीय नेते, घडामोडींवर हिंदी, मराठी चित्रपटातील गाणीही चपलख बसतात.
Holi Festival
Holi FestivalPudhari
Published on
Updated on
सुमित वाघमोडे

धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त जसे रंग उधळले जातात. अनेक रंग लावून त्यातून नवा रंग तयार होतो. त्याच पद्धतीने राजकारणाचे रंगही एमकमेकांमध्ये मिसळून एक नवा रंग तयार होतो. राजकारणाच्या या नव्या रंगातून पुन्हा नवे चेहरे उदयास येतात. राजकीय नेते, घडामोडींवर हिंदी, मराठी चित्रपटातील गाणीही चपलख बसतात.

पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री झाल्यापासून जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाबरोबरच भाजपवर मजबूत पकड बनवली आहे. त्यांच्या नेतृत्वात नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपला पहिल्यांदाच ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे सध्यातरी ते एकटेच डॉन असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अरे दिवानो मुझे पहचानो, कहाँसे आया मैं हू कौन, मैं हू कौन, मैं हू कौ, मैं हू , मैं हू डॉन.. डॉन.. डॉन....

आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख

सोलापूरची भाजपा या दोन आमदारद्वय देशमुखांवर चालत होती. हम करे सो कायदा असा त्यांचा रुबाब होता. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होत गेले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या साथीने आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांचा गट पॉवरफुल झाला. त्यामुळे या दोन्ही देशमुखांच्या गटात सध्या भयाण शांतता आहे.

ये शहर है अमन का, यहाँ की फिजाएँ निराली, यहाँ पे सब शांती, शांती है.. यहाँ पे सब शांती शांती है..

आ. सचिन कल्याणशेट्टी

2019 मध्ये आमदार झाल्यापासून सचिन कल्याणशेट्टी यांचा भाव चांगलाच वधारला आहे. संधीचे सोने करीत त्यांनी कामाचा धडाका लावला. त्यांच्याकडून कोणतेही काम लगेच होते, अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्याचबरोबर ते ज्यामध्ये हात घालतील तेथे त्यांना यश आले. त्यांनी गेल्या आठ वर्षांत जिंकण्याचा सपाटा लावला.

मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं..

आ. देवेंद्र कोठे

लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या प्रचारापासून आ. देवेंद्र कोठे यांनी भाजपमधील स्थान पक्के केले. शहर मध्य मधून आमदारकी मिळवत दोन्ही देशमुखांना धक्का दिला. मुख्यमंत्र्यांचे लाडके म्हणून ओळख निर्माण झाली. महापालिका निवडणुकीत त्यांची रणनीती यशस्वी झाली आहे. शहरातील त्यांचे वजन आणखी वाढले. ते सध्या एकच म्हणतात, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच माझा देव.

देवा, देवा ओ देवा देवा, नमो नमहा, देवा देवा ओ देवा देवा नमो नमहा...

माजी आ. राजेंद्र राऊत

विधानसभेचा पराभव राजेंद्र राऊत यांनी भलताच मनावर घेतला. त्यानंतर झालेल्या बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना आस्मान दाखवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. राजाभाऊ किसीसे कम नही म्हणत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक यश बार्शी तालुक्यात मिळवून दिले. सध्या ते एकच म्हणत आहेत यहाँ के हम सिकंदर.

हारी बाजी को जितना हमें आता है, वो सिकंदरही दोसतो कहलाता है.

खा. प्रणिती शिंदे

खासदार झाल्यापासून प्रणिती शिंदे या सोलापुरात कमीच दिसायला लागल्या आहेत. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत खा. प्रणिती शिंदे यांनी म्हणावे तसे लक्ष घातले नाही, अशी चर्चा काँग्रेसचेच कार्यकर्ते करीत आहेत. स्वतः सोडून ते इतर नेते आणि कार्यकर्त्यांचा विचार करीत नाहीत, असे बोलले जात आहे.

मैं नही तो कौन बे, मैं नही तो कौन मै नही तो कौन

अमोल शिंदे

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत संपूर्ण भाजपला अंगावर घेतले. महाविकास आघाडीने भाजपशी लढायला हवे होते. परंतु अमोल शिंदे यांनी एकट्याने ही लढाई लढत विरोधकांची स्पेस काबिज केली. हर प्रकारे जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला आम्हीदेखील काही कमी नाही, असे सांगत विजय मिळवला आणि सांगितले हम किसीसे कम नही...

है अगर दुष्मन दुष्मन जमाना कम नही, कोई आए कोई जाए हमी किसीसे कमी नही.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

शिवसेनेत दाखल झाल्यापासून ज्योती वाघमारे यांनी प्रवक्तेपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत थेट राज्यसभेची उमेदवारी दिली. लवकरच त्या खासदार होतील. ज्योतीताईंनी आंबेडकरी चळवळीत काम करताना अनेक सभा गाजवल्या. मी भीमाची लेक हे त्या कायम सांगत असतात. एक सर्वसामान्य कुटुंबातील आंबेडकरी चळवळीतील लेक खासदार झाली आणि त्यांचं सोनं झालं.

झुंजार हाय मी, अंगार हाय, मी भीमाची वाघिण खंबीर हाय, छाती ठोकून सांगते निळ्या रुबाबात, भीमाची लेक मी लाखात नाही कुणाच्या धाकात....

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news