हुतात्मा, इंद्रायणीसह शताब्दी रद्द; चार दिवसांचा असेल ब्लॉक

दौंड जंक्शन, दौंड कॉर्ड लाईनवर इंटरलॉकिंग प्रणालीचे काम
Railway block
हुतात्मा, इंद्रायणीसह शताब्दी रद्द; चार दिवसांचा असेल ब्लॉकfile photo

सोलापूर : दौंड जंक्शन आणि दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्थानकावर जुनी इंटरलॉकींग प्रणाली व्यवस्था बदलून, त्याठिकाणी नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. २९ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान हे काम केले जाणार असून यासाठी चार दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा फटका सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना बसणार आहे.

रेल्वे प्रशासनाने पुण्याकडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या कुर्डूवाडी, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यात सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या हुतात्मा, शताब्दी, इंद्रायणीसह अन्य गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरच्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

बातमी अपडेट होत आहे...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news