Solapur Crime: महिलेसोबत संबध ठेवण्यास लावून चित्रीकरण

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी
Solapur Crime
Solapur CrimePudhari
Published on
Updated on

सोलापूर : महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करीत त्याचे व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यानंतर ते चित्रिकरण दाखवून डांबून मारहाण करीत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील अंबाड येथे घडला. या प्रकरणी महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली.

आलिशा शाहबाज खान (वय 20, रा.अंबाड, ता. माढा) हिने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 21 एप्रिल रोजी तिचा पती शाहबाज खान याच्या ओळखीच्या महिलेने तू मला खूप आवडतोस म्हणून त्यास शेतात घेऊन गेली. त्याला व त्याच्या मित्राला महिलेने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित आरोपींनी त्यांना बंद पडलेल्या दुकानात डांबून जबर मारहाण केली. शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडीओ दाखवला. दोन लाख रुपये दे नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. दोन लाख नसतील तर विलास कापरे याच्या विटभट्टीवर तुला आणि तुझ्या पत्नीला हॉटेलवर दोन वर्षे काम करावे लागेल असे सांगितले.

दरम्यान, हा प्रकार कळाल्यानंतर आलिशा खान हिने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दीपक विश्वनाथ भालके, रणधिर दीपक भालके, विक्रम सरवदे आणि संशयीत महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांनाही तात्काळ अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news