Solapur News | महापालिकेवर रोवणार भाजपाचा झेंडा

शहराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताच रोहिणी तडवळकर यांची घोषणा
Solapur News |
सोलापूर : सोलापूर शहराध्यक्षपदाचा पदभार नरेंद्र काळे यांच्याकडून स्वीकारताना रोहिणी तडवळकर. Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षपद हे पद नसून ती व्यवस्था आहे आणि पक्षवाढीची ती जबाबदारी आहे. सर्वांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले.

भाजपाच्या निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर भारती दिगडे, ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, विक्रम देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, नरसिंग मेंगजी, श्रीकांचना यन्नम, प्रा. मोहिनी पत्की, सुरेश चिक्कळी, प्रा. नारायण बनसोडे, पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, अर्चना वडनाल, संपदा जोशी, इंदिरा कुडक्याल उपस्थित होते.

शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर आगामी काळात कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. 2017 मध्ये राजकीय कार्य थांबवून पूर्वीपासून सुरू असलेले सामाजिक कार्य करत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सरचिटणीस करून नव्या - जुन्यांची सांगड घालत एकोप्याने काम केले. भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा वाढीव जागांसह सत्ता आणणार असल्याचा विश्वासही नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला. सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी भाजपा सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, अर्जुन जाधव, महेश देवकर, नागेश खरात, बजरंग कुलकर्णी, माजी नगरसेविका संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरूड, माजी नगरसेवक नगरसेवक श्रीनिवास करली, अनंत जाधव, मोहन डांगरे, चन्नवीर चिट्टे, अंबिका पाटिल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news