

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती 2 ऑक्टोबर देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विविध कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपच्या शहराध्यक्ष रोहणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर शहर, जिल्ह्यातील या अभियानाचे जिल्हा संयोजकपदी शिवराज सरता सहसंयोजक पदी अनिल कंदलगी, दत्तात्रय पाटील, राम वाकसे, सोशल मिडिया प्रतिनिधी पदी योगेश गिराम, सहप्रतिनिधी संदीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
सेवा परमो धर्मः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढे नेत या अभियानांतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण (एक पेड माँ के नाम), रक्तदान शिबिर, युवा मोर्चाच्या नेतृत्वात मोदी विकास मॅरेथॉन, दिव्यांग सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वितरण, डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन, प्रबुद्ध संमेलन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त बूथस्तरावर अभिवादन. 25 सप्टेंबर रोजी बूथ कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांच्या घरी भोजन,दि. 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पांजली, खादी वस्तूंची खरेदी करणे व नागरिकांना घेण्यास प्रेरित करणे इत्यादी कार्याक्रमाचा समावेश आहे.
आज होणार कार्यशाळा
सेवा पंधरवडा शहरांमध्ये राबविण्यासाठी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा दि.11 सप्टेंबर डफरीन चौक येथे होणार आहे. पालकमंत्री . जयकुमारजी गोरे,आ. विजय देशमुख,आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्रजी कोठे उपस्थित राहणार आहेत. शहर जिल्ह्यातील सर्व 8 मंडलांमध्ये या कालावधीत सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत.