Solapur District Bank: सोलापूर जिल्‍हा बँक ताब्‍यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न

आ. कल्याणशेट्टी, आ. राऊतांसह माजी आ. पाटलांच्या नियुक्तीच्या हालचाली; प्रस्ताव पाठविल्याची माहिती
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on
Updated on

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे आ. सचिन कल्‍याणशेट्टी, आ. राजेंद्र राऊत आणि माजी आ. राजन पाटील या तिघांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, याविषयी अंतिम निर्णय सरकारमधील वरिष्ठ, वजनदार नेतेच करणार आहेत. भाजपाकडून त्याविषयी हालचाली सुरु आहेत. तसा अहवाल जिल्‍हा उपनिबंधक कार्यायलयाकडून विभागीय सहनिबंधकांकडे गेल्‍याची माहिती समोर आली आहे.

बँकेवर नवीन प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा बँकेवर २०१८ पासून प्रशासक कार्यरत आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून बँकेचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासाठी इच्छुकांकडून लॉबिंगही वाढले आहे.

जिल्‍ह्याचे लागले लक्ष

जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाची वित्तीय संस्था आहे. प्रशासकीय मंडळाची नियुक्ती हा केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाची आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news