Solapur Politics : सोलापूर मनपाच्या स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व

पाटील, वानकर, प्रधाने, वाघमोडे, जाधव, चव्हाण, बडूरवाले यांना भाजपकडून संधी
Solapur Municipal Corporation |
सोलापूर मनपाच्या स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्वFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांपैकी भाजपच्या 14 सदस्यांची वर्णी लागली. शिवसेना व एमआयएम पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 20) यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत स्थायी समिती सदस्य निवडीचा महत्त्वाचा विषय मंजूर करण्यात आला.

सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभागृहात स्थायी समिती सदस्य निवडीची नावे वाचून दाखवली. त्यानुसार भाजपच्या वतीने अविनाश पाटील, सतीश सिरसिला, रंजिता चाकोते, बिजू प्रधाने, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील आणि अमर पुराले यांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, तर एमआयएमचे गाझी जाहगीरदार यांची सदस्यपदी निवड निश्चित करण्यात आली. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

‌‘कुबेराच्या खुर्ची‌’वर कोणाची वर्णी?

सभापतीपदासाठी अविनाश पाटील, रंजिता चाकोते, बिजू प्रधाने आणि जयकुमार माने, राजकुमार पाटील, अविनाश पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याविषयी लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थायी समितीवर भाजपचे स्पष्ट वर्चस्व असल्याने सभापती भाजपाचा होणार आहे. महापालिकेतील पुढील आर्थिक आणि विकासकामांच्या निर्णय प्रक्रियेत स्थायी समितीची भूमिका महत्त्वाची असल्याने ङ्गकुबेराच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते पहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news