

सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये पशू-पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्यामुळे तीन ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करत नागरिकांसाठी निर्बंध घातले होते. या निर्बंधांचा शुुक्रवारी (दि. 4) शेवटचा दिवस आहे. पशू-पक्ष्यांचे मृत्यूचे प्रमाणही घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध उठवण्याच्या आदेशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
सोलापूर शहरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, सावरकर मैदान, धर्मवीर संभाजी तलाव परिसरात अनेक पशू-पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरांमध्ये खळबळ उडालीहोती. या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनांकडून तीन ठिकाणी निर्बंध घातले होते. नागरिकांना या परिसरात वारण्यास 21 दिवस निर्बंध घातले होते. सरदचा परिसर सीलही केला होता. महापालिका प्रशासनाकडून सावरकर मैदान आणि पार्क चौपाटीही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घातलेल्या निर्बंधाचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून परिसरातील पशू-पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या परिसरात घालण्यात आलेले निर्बंध उठवण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हाधिकारी सोलापुरात नाहीत. प्रशासकीय अधिकार्यांना त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
गुरुवार (दि. 3) रात्री उशिरापर्यंत अद्याप कोणतेही आदेश याबाबत निघाले नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी आशीर्वाद आल्यानंतर याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध घातलेल्या परिसरात पुन्हा नागरिकांना वावर करता येणार आहे. तर सावरकर मैदान, पार्क चौपाटी पुन्हा खवय्यांसाठी सुरू होणार आहे; मात्र जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.