Sangola Accident : ट्रक-मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वार ठार

सांगोला–मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Sangola Accident
ट्रक-मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

वाटंबरे : सांगोला–मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर पुजारी वस्ती परिसरात सोमवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मालवाहतूक ट्रक क्र. (आर. जे. १९-जी.के.६६६२) व मोटारसायकल क्र.(एम. एच. ४५ व्ही. ६६७८) यांच्या झालेल्या भीषण अपघातात सत्यप्रकाश नवनाथ पवार (वय ३४, रा. वाटंबरे, ता. सांगोला) हा युवक गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला आहे.

अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेने सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यप्रकाश नवनाथ हा वाटंबरे येथे वाॅटर फिल्टर विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करत होता. या व्यवसायानिमित्त तो जात असताना हा अपघात घडला आहे. या घटनेची सांगोला पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलिस करत आहेत. दरम्यान, तीन दिवसात वाटंबरे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. गावातील वयोवृद्ध नागरिक जनार्दन पवार यांचे शनिवारी, रविवारी कलावंती पवार, तर सोमवारी सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. वर्षातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बेंदूर सणावरही यामुळे दुःखाचे सावट दिसून येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news