Manohar Bhosle | भोंदू मनोहर भोसलेच्या 20 बँक खात्यामध्ये 3 कोटीहून अधिकच्या रक्कमा! एसआयटीच्या पाच अधिकाऱ्यांकडून तपास सुरु

भोंदू भोसलेचे अनेक कारनामे उघड
भोंदू मनोहर भोसले
भोंदू मनोहर भोसले
Published on
Updated on

करमाळा : अंधश्रद्धा पसरवून भक्तांची फसवणूक करून आर्थिक शोषण व महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी करमाळा तालुक्यातील घोटी ता. करमाळा येथे 27 एकर परिसरात चालवत असलेल्या आश्रमाचा मुख्य सूत्रधार भोंदू मनोहर मामा भोसले याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासा प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पाच अधिकाऱ्या मार्फत मनोहरमामा ची एसआयटी चौकशी सुरू केली आहे.

या चौकशीतून भोंदू मनोहरमामा भोसले चे अनेक कारणामे उघड होत आहेत. जादूटोणा आणि भोंदूगिरी व लैंगिक शोषण प्रकरणात करमाळा पोलीस ठाण्यात जेलची हवा खात असलेल्या भोंदू मनोहर भोसले यांच्यावर एकापाठोपाठ एक तब्बल सहा गुन्हे दाखल झालेले असून पहिला गुन्हा कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यानंतर उर्वरित पाच गुन्हे करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत.

भोंदू मनोहरमामा भोसलेच्या अनेक प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुखांनी पाच अधिकाऱ्यांची एसआयटी ची टिम गठीत करून गुन्हयाची तपासणी व चौकशी सुरू केली आहे. यामध्ये भोंदू मनोहरमामा ची वीस हून अधिक बँकांच्या खात्यांची तपासणी केली असता तीन कोटीहून अधिकचे व्यवहार सापडले आहेत. यामुळे मनोहर मामा भोसले च्या अडचणीत वाढ झाली आहे.

भोंदू मनोहर भोसले
Manohar Bhosale Case: भोंदू मनोहर भोसलेच्या नावे चिलवडीत 25 एकर शेतजमीन

मनोहरमामा भोसले सध्या करमाळा येथे न्यायालयीन कोठडीची हवा खात आहे. यापूर्वी याच मनोहर मामा भोसले यांनी करमाळा तालुक्यातीलच उंदरगाव येथे 2021 मध्ये आश्रम चालवून श्री संत बाळूमामा चा अवतार असल्याचे भक्तांना सांगून महिलेवरील अत्याचार व फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल चार महिने तो जेलमध्ये होता.

बार्शी येथील जिल्हा सत्रन्यायालयातून जामिनावर सुटलेल्या मनोहर मामा भोसले याने उंदरगाव येथील आश्रम बंद करून घोटी ता. करमाळा येथे 27 एकरात 2022 साला पासून आश्रम थाटलेला आहे. या आश्रमात अमावस्या व पौर्णिमेला भक्तांच्या दरबारात भोंदू मनोहरमामा भविष्य पाहत असे. भोंदू मनोहरमामाच्या घोटी येथील आश्रमास नियमबाह्य वीज कनेक्शन घेऊन फुकट वीज वापरल्याचा गुन्हा त्यांच्या पत्नीवर दाखल झाला. आश्रमाची जागा बिगर शेती करून घेतली नसल्याने तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली शिवाय आश्रमाच्या बांधकामास घोटी ग्रामपंचायत ची परवानगी घेतली नाही. आश्रम परिसरातील शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे.

अनेक ठिकाणी आश्रम

भोंदू मनोहर मामा भोसले याचे करमाळा तालुक्यात उंदरगाव व घोटी, पुणे, कोल्हापूर त्याशिवाय कर्नाटक राज्यात गाणगापूर येथे आश्रम आहेत त्याशिवाय नवी मुंबई व मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये मनोहर मामा व्हीआयपी लोकांचे भविष्य पाहत असे. मनोहर मामा भोसले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात चिलवडी शिवारात पंचवीस एकर शेत जमीन घेतली असून पुण्यातील मांजरी व हडपसर भागात फ्लॅट आहेत या संपूर्ण मालमत्तेची चौकशी सुरू आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news