Chandrakant Patil: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील; भाजपची पश्चिम महाराष्‍ट्र विभागीय बैठक
Chandrakant Patil: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा
Published on
Updated on

​सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार निवडून येतील अशारीतीने मतदारांची नोंदणी करावी. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना केले.

भाजपचे पश्चिम महाराष्‍ट्र विभागीय संघटनात्मक बैठक येथे पार पडली. त्यावेळी मंत्री पाटील यांच्यासह राजेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. संघटनात्मक कार्याचा आढावा घेत या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा परिवाराची विचारधारा आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य करावे, अशी अपेक्षाही मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, एसआयआर महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या, खा. धनंजय महाडिक, आ. गोपीचंद पडळकर, आ. मनोज घोरपडे, आ. राहुल कुल, प्रदेश सचिव राम सातपुते यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

७५ हजार मतदार नोंदणीचे उद्दिष्ट

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला असून, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात येत्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे कमळ फुलवायचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या विचारधारेच्या पदवीधर मतदारांची नोंदणी करावी, अशा सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातून ७५ हजार मतदारांची नोंदणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news