

बार्शी : येथे श्री भगवंताच्या दर्शनासाठी नातेवाईकासोबत दुचाकीवरून येणार्या दुचाकीस भरधाव वेगातील बसने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली अडकून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बार्शी-कुर्डुवाडी बाह्य वळण रस्त्यावर सकाळी घडली.
श्रावणी रणजीत उबाळे (वय 13 , रा. चिंचगाव ता. माढा) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.रणजीत उबाळे व संदीप उबाळे अशी जखमींची नावे आहेत. देवीदास परशुराम खंडेभराड रा. बुलढाणा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे.
संदीप उबाळे फिर्यादीत म्हटले आहे की, दि.6 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास ते व त्यांचा भाऊ रणजीत व पुतणी श्रावणी असे दुचाकीवरुन चिंचगाव येथून बार्शी येथे भगवंताच्या दर्शनासाठी निघाले होते.ते स्वतः दुचाकी चालवत होते. मध्यभागी पुतणी श्रावणी बसली होती व मागे भाऊ रणजीत बसला होता. सकाळी 10.30 च्या सुमारास बार्शी ते कुर्डूवाडी रोडवरील कुर्डूवाडी बाह्यवळण चौकात मागून आलेल्या एस.टी. बसने त्यांच्या मोटार सायकला जोराची धडक दिली. दुचाकी एस.टी. बसच्या चाकाखाली आडकली. पुतणी श्रावणी हिच्या पोटावरुन चाक गेल्यामुळे गंभीर जखमी झाली. उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.