Bar Council Election: ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्‌ट्रिक

सोलापुरातील जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्‌ट्रिक साधली
Bar Council Election: ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्‌ट्रिक
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्‌ट्रिक साधली. त्‍यांना पहिल्‍या पसंतीची तीन हजार ८२९ मते मिळाली. त्‍यांनी यापूर्वी दोनदा संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्य पदाकरिता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीस उभारलेल्या एकूण १५५ उमेदवारांपैकी १८ पुरुष व ५ महिला सदस्यांच्या निवडीकरिता पसंतीक्रमाने सुमारे एक लाख वकिलांनी २४ मार्च रोजी मतदान केले होते. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मुंबई येथे जाहीर करण्यात आला. ॲड. मिलिंद थोबडे हे पहिल्या पसंतीची तीन हजार ८२९ मते मिळवून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजय नाथानी यांनी जाहीर केले.

ॲड. मिलिंद थोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सन २०११ व २०२२ मधे अध्यक्षपद भूषविले आहे. सोलापूर बार असोसिएश्नच्‍या वतीने अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी मिलिंद थोबडे यांच्‍या विजयाबद्दल शुभेच्‍छा दिल्या. सोलापुर जिल्ह्यातून निवडणूक लढवणारे उमेदवार ॲड. संतोष न्हावकर, ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ॲड. धनश्री घाडगे, ॲड. महेश कसबे, ॲड. असीम बांगी व ॲड. हेमा शिंदे हे पराभूत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news