

सोलापूर : मार्च महिना सरकारी कर्मचार्यांसह सर्वसामान्यांसाठी आनंदाचा असेल. 2025 मधील मार्च हा महिना आजपासून सुरू होत आहे. मार्च महिन्यात होळीची सार्वजनिक सुट्टी असेल. तसेच महिन्याची सुरुवात शनिवारपासून होत आहे. यामुळे महिन्यात पाच रविवार आणि पाच सोमवार असतील. यामुळे 31 दिवसांच्या महिन्यात एकूण 11 दिवस सरकारी कार्यालय व बँका बंद असतील.
मार्चमध्ये जोडून सुट्ट्या येत आहेत. एक व दोन मार्चला शनिवार व रविवार, त्यानंतर आठ व नऊ मार्चला दुसरा वीकएंड, 14 मार्चला धूलिवंदनानिमित्त शासकीय सुट्टी असेल. त्यानंतर 15, 16 मार्चला पुन्हा शनिवार आणि रविवार, तसेच 29 व 30 मार्चला सुट्टी आहे. 31 मार्चला रमजान ईद आहे, मात्र या दिवशी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे 29, 30 मार्च हे दोन दिवस लागून सुट्टी आली आहे. यामुळे नागरिकांकडून पर्यटनाचा प्लॅन आतापासून सुरू झाला आहे.
मार्च महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. काही धार्मिक उत्सवही आहेत. याशिवाय होळी सारखा सण आहे. राज्यभरात गुढीपाडवा 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी रविवार असल्याने वेगळी सुट्टी राहणार नाही.