

निमगाव : केळी हे पीक शेतकर्यांना जास्त पैसे मिळवुन देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकर्यांनी अधिकचा खर्च करून रोपे जादा दराने घेऊन केळी लागवड केली. पावसाच्या वातावरणामुळे घडांवर तांबेरा पडल्याने बागेतील 40 ते 50 टक्केच माल निर्यात होत आहे. निर्यात न होणार माल व खोडवा स्थानिक बाजारासाठी व्यापारी 3 ते 5 किलो दराने खरेदी करत आहेत.
चांगली केळी असूनदेखील दर चांगला मिळत नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात लाखो रूपये खर्च करून शेतकर्यांनी आणलेली केळी बागेत पिकली आहे. त्यामुळेच शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
बागेत केळी पिकून नाश होण्यापेक्षा पंढरपूरच्या मार्केटला शेतकर्यांने स्वतः काढुन वाहन भाड्याने करून नेली असता उक्ते काढतात. उर्वरित माल 3 ते 4 दर काढतात. त्यामुळेच केळीचे घड काढण्याची मंजुरीही निघत नाही. फक्त वाहन भाडे निघते. ही अवस्था असल्याने केळी जागेवर पिकली आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे स्थानिक बाजारात केळीला मागणी नसल्याने दर पडले असल्याचे केळी व्यापारी सतीश तोरणे यांनी सांगितले आहे.