

बार्शी : सोलापूर ग्रामीण दंगा नियंत्रण पथकाने गुरुवारी मध्यरात्री बार्शी-मालवंडी रोडवरील बळेवाडी येथील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या छाप्यात अश्लील नृत्य, बेकायदेशीर दारूसाठा व शस्त्र बाळगल्याप्रकरणी बार मालक, मॅनेजर, 18 महिला व 9 ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एकूण 57 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बार मालक युवराज बारंगुळे (रा. खांडवी), समाधान पाटील, (रा. बळेवाडी), मॅनेजर अमोल पाटील, (रा. बळेवाडी; व 18 नर्तिका महिलांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रहिम अल्लाद्दीन मुल्ला, दंगा नियंत्रण पथक, सोलापूर ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्रपाळी दरम्यान बार्शी-मालवंडी रोडवरील सॅन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला तोकड्या कपड्यात बिभत्स व अश्लील नृत्य करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्याआधारे पो.कॉ. सचिन सपाटे, बुद्धभूषण खरात, आकाश पाचकुडवे, मपोकॉ निशा उइके व चालक पवार यांचे पथकाने बारवर छापा टाकून पाहणी केली असता स्टेजवर 18 महिला तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नृत्य करत असताना दिसल्या. स्टेज व हॉलमध्ये नोटा सदृश्य खेळण्यातील कुपन पडलेली होती.तसेच समोरील 4 सोफ्यांवर 9 ग्राहक इसम बसले होते. ते नर्तिकांकडे पाहून अश्लील हावभाव करत कुपन उधळत होते.ग्राहक म्हणून तेथे मिळून आलेल्या मध्ये बार्शी व सोलापूर येथील रहिवाशांचा समावेश आहे.
पोलिसांनी महागड्या चारचाकी 4 गाड्या, आठ दुचाकी गाड्या, 6 साऊंड, 2 ॲम्प्लीफायर, लॅपटॉप, स्क्रीन,देशी-विदेशी दारू, रोख रक्कम, 1 लोखंडी तलवार, 10 नकली नोटांचे बंडल, 31 मोबाईल ताब्यात घेण्यात आले.बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महिलेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी, विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी, विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.
हे ग्राहक आले तिथे मिळून
पृथ्वीराज पाटील वय 32 वर्षे रा. शिवशक्ती मैदानाच्या मागे, बार्शी, संतोष गायकवाड वय 42 वर्षे रा. पिंपळगाव पान ता बार्शी, सुरज पाटील वय 35 वर्षे रा. रिंग रोड, सुभाषनगर, बार्शी, अभय वाघ वय 28 वर्षे रा. साकत पिंपरी ता बार्शी, बापू पवार वय 40 वर्षे रा. जानराव हॉस्पीटलच्या पुढे कासारवाडी रोड, बार्शी, बालाजी कदम वय 51 वर्षे, रा. पोस्ट चौक, भवानी पेठ, बार्शी, तनीष जाधव वय 23 वर्षे रा. एसआरपीएफ गट नं 10 सोलापूर, रमेश मोरे वय 38 वर्षे, , गोपाळ मलिक वय 33 वर्षे दोघे रा. बळेवाडी ता बार्शी हे ग्राहक म्हणून ऑर्केस्ट्रा मध्ये मिळून आले.