

Attractive floral decorations at Vitthal Rukmini Temple on the occasion of Dussehra festival
पंढरपूर : सुरेश गायकवाड
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या (दसरा) निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याची माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
दसरा अर्थात विजया दशमी. या निमित्त लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलाने सजविले आहे. यासाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ॲार्कीड, ऑथोरियम, सुर्यफूल, ब्लु डेजी, पिंक डेजी, कमिनी, अशोकाची पाने, जिप्सो, मनीप्लांट, ड्रेसिना. इत्यादी फुलांचा व पानांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. पुणे येथील दानशुर भाविक राम जांभूळकर यांनी सेवाभावी तत्वावर मोफत सजावट केली आहे.
डोळ्यांचे पारणे फेडणारी ही आकर्षक सजावट पाहून भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. आज विजयादशमीच्या मुहुर्तावर विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत.