Solapur Crime | ‘रागाने का बघतोस?’ म्हणत लोखंडी गज, सत्तुरने हल्ला; श्रीपूरमध्ये दहा जणांविरुद्ध गुन्हा

श्रीपूर (ता. माळशिरस) येथे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी गज आणि सत्तुरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Youth Assaulted Case Solapur

श्रीपूर : ‘माझ्याकडे रागाने का बघतोस?’ या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. श्रीपूर (ता. माळशिरस) येथे तरुणासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी गज आणि सत्तुरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. १५) दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी आठ जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध श्रीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्षय संतोष शिरसाठ (रा. शिवाजीनगर, श्रीपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर कदम, ओम पवार, सिद्धू नाईकनवरे, समाधान जगताप, बापू नाईकनवरे, अमर कांबळे, अमोल कांबळे, विश्वजीत माने आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Crime News
Solapur Crime News : मोडनिंब येथे दिवसा ढवळ्या बंद घरात चोरी, दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ‘माझ्याकडे रागाने का बघतोस?’ या कारणावरून संबंधित आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यावेळी लोखंडी गज आणि सत्तुरचा वापर करून हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादीसह त्यांच्या नातेवाईकांना दुखापत झाली.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी श्रीपूर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी, वादाचे कारण आणि घटनेतील इतर बाबींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक करिश्मा वनवे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news