

सोलापूर : पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत एकावर पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे ही घटना घडली.
शिवराज सिद्राम लांडगे (वय 25, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) हा शनिवारी गावातील शेतात असताना आदिल गोलंदाज, सोमेश व इतर दोघे तिथे आले. तक्रार मागे घे म्हणत पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.